spot_img
3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

24 ऑगस्टला ’महाराष्ट्र बंद’ 

 

मविआ आक्रमक, भाजपची बदनामी रोखण्यासाठी…
बदलापूरमधील आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचार्‍यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल 10 तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं म्हटलं आहे. याच पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीने अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक 10 तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना तिथून हुसकावून लावलं. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे.
महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकार्‍याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल, असं नाना पटोले म्हणाले.

ताज्या बातम्या