spot_img
9.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

’नमो किसान’चे 2000 आज जमा होणार

मुंबई : राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आले असून त्यांतर आता शेतकर्‍यांसाठीही खुशखबर आहे. नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातल्या एकाच घरात आज एकूण 5000 हजार रुपये मिळणार आहेत. परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकर्‍यांना होणार आहे.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे. एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे.
शेतकर्‍यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्‍यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणे आवश्यक आहे. अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक, खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा. तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
———-

ताज्या बातम्या