spot_img
27.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

माजलगावला राहुल सूर्यतळ तर आष्टी पोलिस निरीक्षकपदी सोमनाथ जाधव

बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या ठिकाणी नवीन अधिकार्‍यांना पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी नियुक्त्या दिल्या आहेत.बहुचर्चित असलेल्या आष्टी पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक सोमनाथ मधुकर जाधव तर माजलगाव शहर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची ऑर्डर झाली आहे.
याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर यांना नियंत्रण कक्षातून अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे वाचक,सपोनि गजानन क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरवरून शिवाजी नगर बीड,सपोनि नितीन श्रीपतराव गुट्टावार यांची परळी शहरला बदली करण्यात आली.याशिवाय आष्टीला शहरला नियंत्रण कक्षातून सोमनाथ जाधव तर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहराला बदली झाली आहे.

ताज्या बातम्या