घटनास्थळी श्वान पथक व एलसीबी पथक दाखल
आष्टी : तालुक्यातील चोभानिमगांव येथील सतीश प्रभाजी झगडे यांच्या राहत्या घरी शनिवार (दि.17) पहाटे 3 च्या दरम्यान सहा जणांनी घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करून दगड भिरकावून धमकी देत घरातील सोने नाणे जबरदस्तीने चोरून नेण्यासाठी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला व चक्क अर्धा तास झगडे कुटुंब व चोरट्यांमध्ये चकमक झाली चोरट्यांकडून दगडफेक करण्यात होती व झगडे यांनीही रायफल मधून हवेत गोळीबार केल्याने चोरटे पसार झाले.
तालुक्यात दरोड्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गाव गावची तरुण रात्र रात्र जागवून गस्त घालत आहेत असेच गस्त घालत असताना भवरवाडीच्या तरुणांना पहाटेच्या सुमारास अज्ञात-सहाजने आढळून आले त्यांचा पाठलाग करत तरुणांनी तिघांना पकडले व तिघे पसार झाले यातील तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आष्टी पोलीस ठाण्यात सतीश प्रभाजी झगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सहा आरोपींची नावे रोहित शंकर मोरे वय 19 वर्ष,किरण गुलाब मोरे व 21 वर्षे राहणार राक्षसवाडी तालुका कर्जत,अजय सुखदेव शिंदे वय 22 वर्षे राहणार कवडगांव ता .जि.अहमदनगर,अक्षय पवार,विशाल बर्डे, दोघे राहणार कोपर्डी ता.जि.अहमदनगर,गुलाब मोरे राहणार चांदवड ता.श्रीगोंदा ,यांनी लोखंडी गज कोयता लोखंडी करवत गिलवर अशा हत्याराने आमच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करून घराच्या दिशेने दगड भिरकावून धमकावून सोने नाणे जबरदस्तीने चोरून नेण्यासाठी घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यावरून फिर्यादी सतिश झगडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा गु.र.नं.338 /2024 कलम 312 इछड 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे हे करत आहेत.पोलिस नाईक हनुमंत बांगर यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.चोरटे आणि झगडे कुटुंबियांची अर्धा तास चकमक झाली दगडफेकही करण्यात आली झगडे कुटुंबाकडून फायर करण्यात आले या चकमकीनंतर चोरटे पसार झाले व पुढे भवरवाडी येथील तरुण गस्त घालत असताना या सहा जणांतील तिघा जणांना चोरट्यांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.शोभा निमगाव येथे घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले असून एलसीबी पथक घटनास्थळी दाखल झाले असून या परिसराची पाहणी करण्यात येत आहे.सदरील तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विक्रांत हिंगे हे करत आहेत.