spot_img
6.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img

पुण्यातून पळालेला मोस्ट वॉटेंड दहशतवादी पकडला

दिल्ली : पोलिसांना इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे. रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉंटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. रिझवान हा पुणे खडखड मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवरती तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
पुणे आयएसआयएस मॉड्यूलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकार्‍यांनी ३ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.
आज(शुक्रवारी) पहाटे दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. णAझA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला १५ ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांनी खडखड मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान हा पुणे खडखड च्या मॉड्यूलशी संबंधित आहे. रिझवानच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेल्यापासून तो लपलेला होता. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या