spot_img
3.2 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

नगर-बीड रेल्वेला गती : अंमळनेर ते एगनवाडीचे हायस्पीडची उद्या रेल्वे टेस्टिंग

बीड : अहमदनगर-आष्टी रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचा पुढचा टप्पा म्हणजे अंमळनेर ते एगनवाडी पर्यंत ही रेल्वे धावणार आहे. त्यासाठीचे टेस्टिंग 9 ऑगस्ट रोजी होत आहे.
नगर बीड परळी रेल्वे पण सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. दोन वर्षापूर्वी अहमदनगर पासून ते सोलापूरवाडी दरम्यात ह्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. एकूण 35 किमी अंतर ही चाचणी घेण्यात आली होती. आतापर्यंत तीन चाचण्या झाल्या. एकदा नगर ते नारायणडोह पर्यंत बारा किमी, आणि नगर ते सोलापूरवाडी 35.5 किलोमीटर आणि नगर ते आष्टी हे 60 किमी चे नगर ते अंमळनेर या 66 किलोमीटर अंतरावर हाय स्पीड चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर आता अंमळनेर ते एगनवाडी चाचणी होत आहे . हे अंतर आष्टी ते एगनवाडी (66.12 किमी) इतके आहे.
अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती. एकूण 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली. या रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ नजीकच्या नदीवर मोठे 13 गाळे असलेला मोठा पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची 33 फुट उंच आहे. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या कामाला वेळ लागत आहे. सुरुवातीला नारायणडोह पर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे धावली आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्य हद्दीत 23.5 किलोमीटर रेल्वे प्रत्यक्ष धावली आहे .
नगर ते नारायणडोह या 12 किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावर मार्च 2018 मध्ये रेल्वेचे इंजिन धावले होते .
रहाशवपरसरी लशशव रिीश्रळ ीरळश्रुरू श्रळपश ीींर्रीीीं सध्यस्थीतीत नगर ते एगनवाडी पर्यन्त 66.12 किमी अंतरावर रेल्वेचे काम 100 टक्के पूर्ण झाले असुन त्यासाठी चाचणी घेण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
रहाशवपरसरी लशशव रिीश्रळ ीरळश्रुरू अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेचे काम प्रगती पथावर आहे.
या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार
अहमदनगर-बीड- परळी-वैजनाथ नवीन लाईन-
लांबी – 261.25 किमी
लांबी कार्यान्वित – 66.18 किमी
उर्वरित – 195.25 किमी
एकूण शारीरिक प्रगती – 78%
जमीन संपादन – 1821.56/1806.19 हेक्टर (99%)
अ) पूर्ण झालेला विभाग-
अहमदनगर ते आष्टी (66.18 किमी)
ब) पूर्णत्वाच्या जवळ-
(या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे)
आष्टी ते एगनवाडी (66.12 किमी)
क) प्रगतीपथावर आहे-
इगनवाडी ते परळी (127.95 किमी)
पूर्ण झालेली कामे-
अर्थवर्क- 419.235/430.43 (97.40%)
प्रमुख पूल – 49/64 (77%)
मायनर ब्रिज – 250/301(83%)
ठजइ/ठणइ – 126/195 (65%)
बॅलास्ट पुरवठा – 6.54/7.52 ङला (87%)
ट्रॅक लिंकिंग – 118.38/285.89 किमी (41%)
पॉवर लाईन क्रॉसिंग – 568/626 (91%)

ताज्या बातम्या