spot_img
16.2 C
New York
Friday, October 31, 2025

Buy now

spot_img

नालीचे पाणी लोकांच्या घरात ; नगरपालिका झोपली ?

शाहुनगर मधील आजी-माजी-भावी नगरसेवक काय करतायत?
बीड : नागरी सुविधांचा सर्वत्र आभाव असतांनाही प्रशासनासह राजकीय पुढारी कुठलीही ठोस भुमिका घेत नसल्याने नागरीकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पांगरी रोडवरील नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. हेच पाणी नागरीकांच्या व व्यापार्यांच्या दुकानात घुसत असून या प्रकारामुळे नागरीकांत संताप व्यक्त केला जावू लागला. शाहु नगर येथील आजी-माजी-भावी नगरसेवक नागरी सुविधेबाबत कुठलाही शब्द काढत नसल्याने अशा संधी साधू पुढार्याबाबतही नागरीकांत नाराजी व्यक्त केली जावू लागली.
पांगरी रोड परिसरात नेहमीच नालीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होते. जुनी उमाकिरण टॉकीज, सागर गॅरेज, तावरे यांचे निवासस्थान, सम्राट हॉटेल या परिसरामध्ये नालीचे पाणी नागरीकांच्या घरात व व्यापार्यांच्या दुकानात घुसत आहे. येथील नाली वेळेवर काढली जात नसल्याने ती तुबूंन रस्त्यावरून वाहते. या रस्त्याने ये जा करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.रस्ता तर व्यवस्थीत नाहीच त्यात पुन्हा नालीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने येथील नागरीक प्रचंड प्रमाणात वैतागले आहेत. नगरपालिका प्रशासन याबाबत कुठलीही भुमिका घेत नाही, आजी माजी आणि भावी नगरसेवकांना नागरी प्रश्‍नांचा विसर पडल्याने संताप व्यक्त केला जावू लागला आहे.

ताज्या बातम्या