spot_img
21.2 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक पेटला

जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक
पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना
गेवराई : गेवराईहून बीडकडे मेंढ्या-शेळ्या घेऊन येणार्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीमध्ये ३० पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ घडली. ट्रकला आग लागल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आतील काही शेळ्या मेंढ्यांना बाहेर काढल्याने त्या वाचू शकल्या. यात ट्रकचेही मोठे नुकसान झाले.
मध्यरात्रीच्या दरम्यान एक ट्रक गेवराईहून बीडकडे शेळ्या मेंढ्या घेऊन येत होता. पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ ट्रक (क्र. आर..जे. १९ जीजे ४७९७) ला अचानक आग लागली. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने गाडी थांबवली. या आगीमध्ये ३० पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून मरण पावल्या. ट्रक जळत असल्याचे तेथील काही नागरिकांच्या आणि येणार्या जाणार्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आतील शेळ्या मेंढ्या बाहेर काढल्यामुळे काही शेळ्या-मेंढ्या वाचल्या. यात ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सदरील ट्रकला आग कशी लागली? हे मात्र समजू शकले नाही. या जळीत घटनेत संबंधित व्यापार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान या ट्रकमध्ये १७० शेळ्या-मेंढ्या होत्या.

ताज्या बातम्या