spot_img
21.2 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

अज्ञात वाहनाने धारूर रोडवर पती-पत्नीस उडविले

धारूर : रोडवरील नेहरकर पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली.
धारूर तालुक्यातील आवरगाव येथील घनश्याम ऋतू पद्म शिंदे वय ४० हे आणि त्यांच्या पत्नी हे केज कडून धारूर कडे रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान निघाले होते. दरम्यान भवानी मंदिराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एका पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये घनश्याम शिंदे यांच्या पायाला, डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत. सदरील अपघाताची माहिती मिळताच १०८ ची रुग्णवाहिका त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आणि जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या