spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक घोषित

बीड : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक या महिन्यात घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अँड. अजित एम. देशमुख यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून या कार्यक्रमानुसार दि. १३ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. आणि त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मतदार यादी घोषित करण्यात आली असून मतदार यादीवर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेण्याची दिनांक पाच ऑगस्ट रोजी सोमवारी संधी देण्यात येणार आहे. या आक्षेपांची सुनावणी घेऊन सहा ऑगस्ट रोजी आक्षेपांवर निर्णय जाहीर करण्यात येईल.
दि. सात ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज वाटप केले जाणार असून त्याच दिवशी सायंकाळ पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आणि उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर दिनांक ८ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जाहीर केली असून या दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल आणि त्याच दिवशी चार नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. यावर्षी वकील संघाचे सातशे अंशी सभासद झाले आहेत.

ताज्या बातम्या