spot_img
3.2 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

लाच स्वीकारताना मुख्याध्यापक भारत येडे यांना अटक

गेवराई : वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाने लाचेची मागणी केली होती. २७०० रुपयाची लाच स्वीकारताना बीड एसीबीने लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले . या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पंचायत समितीमध्ये हे आठवड्यातले दुसरे लाचखोरीचे प्रकरण आहे .
गेवराई तालुक्यातील मण्यारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक आणि पूर्वाश्रमीचे बीड जि . प . चे आदर्श शिक्षक भारत शेषराव येडे यांना २७०० ची लाच स्वीकारताना जुन्या बसस्टॅन्ड नजीक असलेल्या चहापाणी अमृततुल्य हॉटेलमध्ये २९ जुलै रोजी सोमवारी करण्यात आली . तक्रारदार शिक्षक आहेत . त्यांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्तीनुसार मान्य केले . संबंधित मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आहे किंवा कसे असे पत्र काढले होते . त्यावरून तक्रारदार यांचे वरील वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व जिल्हा परिषद बीड मध्ये मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची १० टक्के रक्कम २७ हजाराचे दहा टक्के प्रमाणे २७०० रुपयाची लाचेची पंचायत समक्ष मागणी केली . लाचेची रक्कम येडे यांनी स्वतः स्वीकारले . यावेळी भारत येडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले . या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी शेख युनूस, सह सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड ,पोलीस अंमलदार सुरेश सांगळे ,भरत गारदे, अविनाश गवळी ,अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेह्त्रे यांनी काम पाहिले . भारत येडे हे प्राथमिक शिक्षक असताना वरिष्ठांशी सुमधुर संबंध असल्याने त्यांनी बीड जि . प . चा आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावला होता . त्याची अनेक वर्षे चर्चा होती . दुसरी चर्चा भारत येडे यांनी अनेक वर्षे गटशिक्षण कार्यालयात संगणकाचे काम केले . ते एव्हढे एक्पर्ट झाले होते की कोणताही गशिअ आला तरी त्यांच्याच हाताखाली राबत असे . १० – १५ वर्ष त्यांनी अध्यापनाचे काम केलेच नाही . ऑफिस ताब्यात ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता . सेवानिवृत्ती जवळ येत असताना पहिल्यांदाच ते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाहीत सापडले .

ताज्या बातम्या