spot_img
12.8 C
New York
Saturday, October 18, 2025

Buy now

spot_img

हार्दिक पांड्या – नताशाच्या घटस्फोटाच्या घोषणा पत्रात ‘या’ 5 मोठ्या गोष्टी आल्या समोर

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अखेर नताशा हिने मुलासोबत भारत सोडल्यानंतर हार्दिक याने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. एक पोस्ट करत हार्दिक याने घटस्फोट झाल्याचं स्पष्ट केलं. हार्दिक याने लिहिलेल्या पोस्टमध्ये पाच मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

सांगायचं झालं तर, 2024 त्या IPL दरम्यान हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. नताशा हिने इन्स्टाग्रामवर हार्दिक याच्यासोबत असलेले सर्व फोटो काढून टाकले होते. काही दिवसांनंतर नताशा हिने फोटो पुन्हा री-स्टोर केले. एवढंच नाहीतर, टी20 वर्ल्ड कपनंतर देखील नताशा हिने हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाहीत.

अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट करत हार्दिक याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय हार्दिक याने लिहिलेल्या पत्रात 5 मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. पत्रात सुरुवातीलाच हार्दिक याने परस्पर संमंतीने घटस्फोट विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे.

दोघांनी परस्पर संमंतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, पण कारण सांगितलं नाही. शिवाय, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलं पण त्यामध्ये यश आलं नाही. दोघांचं हित लक्षात घेवून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे… असं देखील हार्दिक पोस्टमध्ये म्हणाला आहे.

पुढे हार्दिक म्हणाला आम्हा दोघांसाठी हा निर्णय घेणं फार कठीण होतं. आम्ही एकत्र असताना आनंदात राहिलो. एकमेकांचा सन्मान केलं. मित्रांसारखं राहिलो आणि कुटुंब म्हणून आयुष्यात पुढे आलो.. पण हार्दिक – नताशा फक्त चार वर्ष एकत्र राहिले. आला अभिनेत्री मुलासोबत तिच्या मायदेशी परतली आहे.

मुलगा अगस्त्य याच्याबद्दल देखील हार्दिक याने भावूक बाजू मांडली. काहीही झालं तर अगस्त्य केंद्रस्थानी असले. पालक म्हणून त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही… याची आम्ही काळजी घेऊ… घटस्फोटनंतर देखील हार्दिक – नताशा मुलासाठी कायम एकत्र असतील… असं पत्रातून समोर येत आहे.

पत्राच्या शेवटी हार्दिक याने आम्हाला दोघांना समजून घेण्याचा प्रयत्न करा… असं म्हटलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्या