spot_img
6.1 C
New York
Friday, January 9, 2026

Buy now

spot_img

जळगाव(पिंप्री बु) येथे जिल्हा स्तरीय सहजकृषि कार्यशाळा

अलख जगाओ अलख जगाओ गाव गाव मे सहजयोग सहजकृषी फैलाओ 
जागतिक ध्यान दिवस निमित्त पिंप्री बु., ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथे जिल्हा स्तरीय सहजकृषि कार्यशाळा चैतन्यमय वातावरणात संपन्न
परमपूज्य श्री. माताजी निर्मला देवी यांच्या परम कृपेत जागतीक ध्यान दिवस निमित्त पिंप्री बुद्रुक, पिंपळकोठे ता. एरंडोल जळगाव येथे जिल्हास्तरीय सहज कृषि कार्यशाळा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश शेतकर्यांमध्ये सहजयोग आधारित सहजकृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि शाश्वत शेतीसाठी प्रेरित करणे हा होता.
ही कार्यशाळा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेने आणि सहजयोगाच्या चैतन्याच्या साक्षीने अतिशय प्रेरणादायी वातावरणात तसेच प.पू.श्री. माताजी निर्मला देवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा समन्वयक, श्री. नामदेव राहणे , महाराष्ट्र राज्य सहज कृषि समन्वयक आणि श्री. भालचंद्र पाटील, जळगाव सहज कृषि समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
जागतिक ध्यान दिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या सहजकृषी कार्यशाळेची सुरुवात प.पू. श्री. माताजी निर्मला देवी यांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम ध्यान आणि संतुलन घेऊन श्री. गणेश आणि श्री. शाकंभरी देवी पुजन संपन्न झाले. त्यानंतर सहज कृषि कार्यशाळेस श्री. माताजींनी सहज कृषि बद्दल दिलेल्या माहितीने प्रारंभ झाला. या कार्यशाळेत उपस्थित सर्व सहज योगी योगिनींना अनुभवी वक्त्यांनी सहज कृषि विषयी मार्गदर्शन केले, ज्यामध्ये प्रमुखतः श्री. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा समन्वयक यांनी सहज कृषि कार्यशाळा घेण्यामागील उद्देश आणि सहजयोग आणि सहज कृषि चे मानवी जीवनात होणारे फायदे, श्री. नारायण निबे, विभागीय सहज कृषि समन्वयक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात व गोवा यांनी सहजकृषि मध्ये होत असलेले संशोधन आणि संशोधनातील पुढील दिशा, श्री. नामदेव राहणे, महाराष्ट्र सहज कृषि समन्वयक यांनी सहज कृषि व सहज कृषि प्रात्यक्षिक कसे घ्यावे या विषयी मार्गदर्शन केले. श्री. प्रशांत राजवळ, सहाय्यक कृषि अधिकारी, वैजापूर यांनी सहज कृषि पद्धतीने रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांचे व्यवस्थापन, पिक संरक्षण तसेच कृषि विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजना या विषयी उपस्थित सहज योगी बंधू आणि भागीनीना मार्गदर्शन केले. या सर्व मान्यवर वक्त्यांनी सहजकृषीचे महत्त्व, त्याची वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पद्धत, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान प्रभावीपणे समोर मांडले.


यावेळी प्रा. बाळासाहेब ताकटे यांनी श्री. कुलकर्णी काका यांनी ससे पालन करताना ससे या प्राण्यावर सहज कृषी पद्धतीने घेतलेल्या प्रयोगाबद्दल माहिती दिली. श्री. धनगर बाबा खडके आणि श्री. भालचंद्र पाटील यांनी सहज कृषि मधील स्व: अनुभव सांगितले. त्यानंतर ज्वारी पिकाला चैतन्य चैतन्य कसे द्यायचे आणि शेतामध्ये गणेश तत्व कसे स्थापन करायचे याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
जळगाव जिल्ह्य समन्वयक श्री. ज्ञानेश्वर पाटील, सहज कृषि समन्वयक श्री. भालचंद्र पाटील, श्री, मिठाराम पाटील, श्री. रवींद्र पाटील, सुकलाल भडके, भगतसिंग पाटील, प्रविण पाटील, विश्वनाथ पाटील, राजेंद्र पाटील, दिलीप येवले जळगाव जिल्हा सहजयोगी बंधू-भगिनींनी कार्यशाळेसाठी घेतलेली तयारी, परिश्रम आणि समर्पण कौतुकास्पद ठरले.
यावेळी जळगाव जिल्ह्यात सहजकृषी चे कार्य करत असलेल्या सर्व तालुका सहजकृषी समिती समन्वयक यांची मिटिंग घेण्यात आली. सदर मिटींगमध्ये सहजकृषी चे संशोधन सहज योगी बंधू भगिनी यांचे शेतावर कशा प्रकारे घ्यायचे या विषयी श्री. नारायण निबे, विभागीय सहज कृषि समन्वयक, प्रत्येक तालुक्यात १० ग्रामपंचायत अंतर्गत सहजकृषी कार्यक्रमातून आत्मसाक्षात्कार आणि जागृती कार्यक्रम कसा घायचा या विषयी श्री. नामदेव राहणे, महाराष्ट्र सहजकृषी समन्वयक यांनी माराग्दर्शन केले. यावेळी सर्वांनी मिटिंग मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे कार्यक्रम घेण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे सहज कृषी कार्यशाळेस उपस्थित साधकांना कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्कार देण्यात आला.
या कार्यशाळेचा सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे परमपूज्य श्री माताजींच्या चैतन्यामुळे शेतकर्यांना आत्मिक समाधान मिळाले. या चैतन्यमय कार्यशाळेचा अनुभव सर्व सहजयोगी आणि शेतकर्यांसाठी एक अमूल्य प्रेरणा ठरला आहे. या जिल्हासातीय सहजकृषी कार्यशाळेस जळगाव जिल्ह्यातील सहज योगी बंधू भगिनी मोठ्या संख्येने तसेच अहिल्यानगर कोपरगाव येथून आलेले रामनाथ घुले, संभाजी दवंगे, कैलास जाधव, जनार्धन राऊत, पटेल काका इत्यादी सहज योगी तसेच तेथील काही सामूहिक सहजयोगी मंडळींची विशेष उपस्थिती होती. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. रितेश आहिरे, एरंडोल युवा शक्ती समन्वयक तर आभार श्री. प्रविण पाटील, अमळनेर तालुका सहज कृषि समन्वयक यांनी मानले.
श्रीमाताजींचे कोटी कोटी आभार!

ताज्या बातम्या