spot_img
2.3 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

बीडचे नाव राज्यस्तरावर चमकले !

शिवाजीराव महामुनी आणि सतीश महामुनी यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार’ जाहीर.*
​बीड : बीड सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्री.शिवाजीराव महामुनी (वाघीरकर) तसेच पांचाळ सोनार महामंडळाचे सचिव श्री.सतीश महामुनी (मुंगीकर) यांना सोलापूर सोनार समाज संस्थेचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
​​शिवाजीराव महामुनी यांनी मागील दोन ते अडीच दशकांपासून समाजातील प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. सामाजिक उपक्रम असो वा कोणाचे वैयक्तिक संकट, मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवत सतीश महामुनी यांनी महामंडळाच्या माध्यमातून समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे.त्यांनी केलेल्या निस्वार्थ समाजसेवेची व उल्लेखनीय कार्याची दखल घेत सोलापूरच्या संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
​सोलापूर येथील १०० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘सोनार समाज संस्थे’च्या वतीने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सोलापूर येथील ‘निर्मिती लॉन्स’ येथे हा ‘सोनार समाज गौरव सोहळा’ पार पडणार आहे.
​या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे-
​राज्यस्तरीय पुरस्कार वितरण,विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान.
​शासकीय योजना माहिती शिबीर,समाजातील गरजूंपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचा उपक्रम.
​बीडमधील या दोन्ही मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याने सुवर्णकार समाजासह सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अखंड समाजसेवेची पावतीच असल्याची भावना मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या