बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोटरसायकल चोरीचे जाळे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या कारवाईत बीड शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणार्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून आठ (०८) चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर, वय २५ वर्षे, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे आहे.
प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सदर आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. कामाच्या काळात हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे (रीपोझेशन) काम तो करीत होता. याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली.
याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटरसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या मोटरसायकली तो पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे. मी फायनान्स/बँकेत काम करतो, या गाड्या हप्ते थकित असल्याने ओढून आणलेल्या आहेत अशी खात्री देऊन आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करीत होता. फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटरसायकली खरेदी केल्या.
बीड शहर पोलिसांच्या तपासात सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांना खरेदी केलेल्या मोटरसायकली गमवाव्या लागल्या तसेच त्या बदल्यात दिलेली रक्कमही गमवावी लागली अशा प्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे.
मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली,
अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश जाधव,
पोलीस अंमलदार श्री. गहिनीनाथ बावनकर,
पोलीस अंमलदार श्री. राम पवार,
पोलीस अंमलदार श्री. शेख मंगेश शिंदे,
पोलीस अंमलदार श्री. शौकत शेख
तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग होता. यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील २४ गेल्या मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आले असून.. आणखी गुन्ह्यातील सहभाग् सिद्ध आणि निश्चित होणार आहे..

