नाशिक | ज्ञानेश्वर काकड
केंद्रीय कृषी मंत्रालय अंतर्गत येणार्या केंद्रीय एकीकृत नशिजीव प्रबंधन केंद्र, नाशिक या कार्यालय तर्फे गावं ब्राह्मणवाडे मध्ये रब्बी हंगाम २०२५- २६ साठी भाजीपाला पिकावर शेतिशाळा आयोजित करण्यात आली होती. शेतीशाळेला सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी श्री ऋषिकेश मानकर यांनी भाजीपाला पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी कोणते पर्याय वापरता येईल यावर मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर कार्यक्रमा दरम्यान भाजीपाला पिकामध्ये प्रक्षेत्र भेट देऊन किडींची ओळख व उपाययोजना यांची माहिती दिली. शेतकार्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीशाळेस प्रतिसाद दिला.पोलीस पाटील कमलाकर रामराजे ह्यांनी पिके फवारताना व शेता मधून चालताना घ्यावयाची सुरक्षितता याबद्दल उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

