महारक्तदान शिबिर उत्साहात
नाशिक | ज्ञानेश्वर काकड
राज्यभरात निर्माण झालेल्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार सकल मराठा परिवार तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून हुतात्मा स्मारक सिन्नर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजहिताचा दर्जेदार आदर्श ठेवला. या शिबिरासाठी अर्पण रक्तपेढीचे विशेष योगदान मिळाले.या शिबिरातील आकर्षण ठरले ते सैनिक श्री. अनिकेत पवार यांचे अनुकरणीय योगदान. त्यांना प्रथम रक्तदाता होण्याचा मान मिळाला तसेच डॉ. विकास रामहारी मेदगे (६६वे रक्तदान) यांनीही समाजसेवेचे आपले कार्य पुढे चालू ठेवत उपस्थितांचे लक्ष वेधले.शिबिरात अनेक दाम्पत्यांनी एकत्र येऊन रक्तदान करीत समाजात माणुसकीचा संदेश दिला. त्यात श्री व सौ. रविंद्र पवार आणि श्री व सौ मारुती या दाम्पत्यांचा समावेश होता.विशेष म्हणजे महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.काही रक्तदाते वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करू शकले नसले तरी त्यांची उपस्थिती कौतुकास्पद असल्याचे सकल मराठा परिवारातर्फे सांगण्यात आले. सकल मराठा परिवार नाशिक टीमचे सर्व सदस्य नाशिकहुन आले होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विकास मेदगे संतोष बोलधने दिनेश मेदगे जगदीश उगले विवेक मेदगे महेश मुरकुटे दिपक कोरडे अनिल रोहोम प्रमोद घोलप तसेच स्नेहल ताई चौधरी सुनंदा ताई निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले.

