नाशिक | ज्ञानेश्वर काकड
सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे गावात चंपाषष्ठी निमित्त श्री खंडेराव यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या निमित्त बुधवार दि.२६ नोव्हेंबर रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये उत्तर महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीला पहिले बक्षीस 111111 रूपये ठेवण्यात आले होते. यावेळी आयोजकांनी नियोजन देखील अतिशय उत्तम पद्धतीने केले होते.
चंपाषष्ठी निमित्त श्री खंडेराव यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सरपंच विलास अण्णा गीते पोलीस पाटील कमलाकर रामराजे, संयोजक मंडळींनी नियोजन केले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बुधवार दि.२६ रोजी ही स्पर्धा पार पडली. यामध्ये २०२५ उत्तर महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे पहिल्या नंबरचे 11111/ बक्षीस हे संतोष शेठ तोडकर ठाणे ह्यांनी पटकाविले.
उत्तर महाराष्ट्र केसरी हे बैलगाडा शर्यत मैदान यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशन आयोजक,पंच कमिटी, यात्रा कमिटी ब्राह्मणवाडे यांचे खूप अनमोल सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे नायब तहसीलदार श्री सागर मुंदडा, एमआयडीसी पोलीस स्टेशन सिन्नर चे पीआय श्रीभरत जाधव, व सिन्नर पोलीस स्थानकातील सर्व पोलीस बंधू तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

