spot_img
5 C
New York
Sunday, November 23, 2025

Buy now

spot_img

ना.पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या अकाली मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या या तरुणीने आपले जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र तिच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलीस ठाणे गाठले असून, त्यांनी आपल्या मुलीच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत असून, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पोलीस ठाण्यातून हलण्यास तयार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
घडलेल्या या गंभीर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी तातडीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत, बीडमधील आपले सर्व नियोजित सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द केल्याचे वृत्त आहे. आपल्या पीएच्या कुटुंबात घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
मृत तरुणीचा मृतदेह सध्या रुग्णालयात असून, त्यावर पोस्टमॉर्टम केले जाणार आहे. पोलीस आणि कुटुंबीय दोघांनाही आता या अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम अहवालातूनच नेमके सत्य समोर येईल, मृत्यूचे नेमके कारण काय आहे आणि घातपात झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईल. या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, कुटुंबाचे आरोप आणि पोस्टमॉर्टम अहवाल या दोन महत्त्वाच्या बाबींवर पुढील तपास अवलंबून असणार आहे.

ताज्या बातम्या