साथीदारासह वाळूज पोलिसांनी केली अटक
बीड : रविवार दि.१६ रोजी व पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दीत व्हीआयपी मुव्हमेंट साठी बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त दरम्यान कार्यक्रम स्थळी झचज सचिव भारत सरकार कार्यालयातील अधिकारी म्हणून एका व्यक्तीचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. त्यावेळी बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर असलेले परिमंडळ-१ पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर पोलीस उपआयुक्त, यांना प्रधान मंत्री कार्यालयाचे कोणीही अधिकारी शहरात दौर्यावर नसल्याने सदर इसमा बाबत संशय आल्याने अधिक चौकशी साठी त्या इसमास पोलीस ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता सर्व भांडाफोड झाला.
अशोक भारत ठोंबरे असे सांगून सुरवातीस तो निती आयोग भारत सरकार याचा सदस्य असल्याचे सांगीतले. परंतू बारकाईने विचारपूस करता त्याच्याकडे तसी कुठलीही ओळख पुरावा मिळून आला नाही. तो खोटी माहिती देत असल्याचे व लोकसेवक म्हणून तोतयगिरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्याच्या झडती मध्ये त्याचे सुटकेस मध्ये एक पांढर्या रंगाच्या पाटीवर लाल रंगाच्या अक्षरा मध्ये मराठी मध्ये भारत सरकार असे लिहलेली पाटी तसेच ॠजतढ.जऋ खछऊखअ असे लिहलेली पाटी व वाहनावर लावण्यासाठी वारण्यात येणारा भारतीय राष्ट्रध्वज अशा वस्तू मिळून आल्या. तसेच सदर इसमाने त्याच्या सुरक्षेसाठी खाजगी इसम नामे विकास प्रकाश पांडागळे, रा.भिमनगर मनीषपार्क शेजारी कोंडवा खुर्द पुणे हा बॉडीगार्ड म्हणून सोबत ठेवला होता. तो देखील सदर इसमास सहाय करत असल्याचे निष्पण झाले. म्हणून इसम नामे १) अशोक भारत ठोंबरे वय ४५ वर्ष, रा.केंड फ्लोर २/३५, सदर बाझार डेली कॅन्टोलमेंट साऊथ वेस्ट दिल्ली. ११००१०, मुळ पत्ता-उंदरी ता. केज जि.बीड २) विकास प्रकाश पांडागळे, रा. भिमनगर मनीषपार्क शेजारी कोंडवा खुर्द पुणे, यांचे विरुध्द पोलीस ठाणे चखऊउ वाळुज येथे गुन्हा दाखल करून अटके बाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर इसमाने अशा प्रकारे तोतयागिरी करून कोणत्याही नागरीकांची फसवणूक केली असल्यास त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज, येथे माहिती दयावी असे आवाहन करण्यात येते.

