चंद्रपूर : परम पूज्य श्री माताजींच्या परम कृपेने काल दिनांक ३१ऑक्टोंबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त जिवती शहरात पोलिस स्टेशन जिवती आणी सहजयोग ध्यान साधना केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिवती शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली आणी शहराच्या बाहेर असलेल्या विदर्भ महाविद्यालय च्या पटांगणावर रॅली पोहचताच भारताच्या नकाशाची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आली.त्या नंतर सर्व उपस्थितांना महाविद्यालयाच्या हॉलमध्ये बसवून सहजयोगाची माहिती आणी ‘आत्मसाक्षात्कार’देण्यात आला. झालेल्या रन फॉर यूनिटी मध्ये शासकीय, निमशासकीय, सामाजीक संस्था तसेच शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मध्ये उत्सुर्फ पणे सहभाग नोंदवला.श्री माताजी नी आम्हाला या दैवी कार्यासाठी माध्यम बनवून आमच्या कडून दैवी कार्य करवून घेतले त्या बद्दल श्री माताजी चे खूप खूप आभार मानन्यात आले.


