
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
भारतीय मुले आणि मुलीच्या बहारीन येथे झालेल्या तिसर्या आशियाई युवा स्पर्धेत कबड्डीमध्ये दोन्ही संघाने सुवर्णपदके जिंकली.रविवारी (दि.२६ ) संघाचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्राच्या प्रसाद दत्तात्रय दिघोळे आणि सेरेना म्हस्कर यांनी चमकदार कामगिरी करून या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय खेळाडू प्रसाद दिघोळे याचे रविवारी ( दि.२६ ) पुणे येथिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी जोरदार स्वागत करून सत्कार करण्यात आला.
मुलींच्या अंतिम सामन्यात भारतीय मुलींनी इराणचा ७५-२१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.तर मुलांचा अंतिम सामना रोमांचक झाला.ज्यामध्ये भारताने इराणचा ३५-३२ असा पराभव केला. मुलींच्या अंतिम सामन्यात सेरेना म्हस्करने तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून भारताला विजय मिळवून दिला.तर मुलांच्या अंतिम सामन्यात, इराणने आक्रमक सुरुवात केली आणि सुरुवातीला आघाडी घेतली.तथापि भारतीय मुले संयमाने खेळले आणि हळूहळू नियंत्रण मिळवले.सामना एकमेकांशी टक्कर घेणारा ठरला आणि आशियाई युवा खेळ शेवटच्या मिनिटांत तणाव वाढला. इराणने आक्रमक खेळ केला आणि भारतावर दबाव आणला.प्रसाद दिघोळेने दोन इराणी खेळाडूंची झेप घेऊन पकड करून सामन्याला कलाटणी देऊन भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.ज्यामुळे भारतीय संघाला सामना तीन गुणांनी जिंकता आला.
भारतीय खेळाडू प्रसाद दिघोळे याचे रविवारी ( दि.२६ ) पुणे येथिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.यावेळी पुणे येथिल आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रविण नेवाळे,प्रो कबड्डीपट्टू श्रीधर कदम,ओमसाई कबड्डी संघाचे शुभम नेवाळे,जायगाव ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संघातील खेळाडू उपस्थित होते.तसेच मुलीच्या संघातील मुंबई येथिल सेरेना म्हसकरचे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सुधाकर घाग, सरचिटणीस राजेश पडेलकर, वरिष्ठ कबड्डी संघटक मीनानाथ धनजी आणि तिचे पालक मेघाली आणि सचिन म्हसकर उपस्थित होते.

