ज्ञानेश्वर काकड | नाशिक
वन्यजीव सप्ताह अंतर्गत ब्राह्मणवाडे येथील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा येथे बिबट्याचे मानवावरती हल्ले व संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिन्नर वनविभागाचे परिमंडळ अधिकारी श्री तानाजी भुजबळ समवेत वनपाल पांढरे, गीते, चव्हाण, गायकवाड मॅडम,वैद्य इत्यादी वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.दोन्ही शाळेमध्ये त्यांनी कार्यशाळा घेऊन बिबट्या प्राण्याविषयी माहिती दिली व त्यापासून पासून संरक्षण करण्यासाठी सूचना व उपायोजना सांगितल्या.
पोलीस पाटील श्री कमलाकर रामराजे यांनी सर्व वन्य प्राणी आणि जीवजंतू पर्यावरणामधील व अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे. मानवांनी प्राण्यांच्या आदिवासा मध्ये केलेलेअतिक्रमन व उपाययोजना या विषयी मनोगत व्यक्त करून वनविभागाच्या अधिकार्यांचे आभार मानले.या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक सौ पगारे मॅडम, श्री सानप सर श्रीबाळासाहेब रामराजे, श्रीमधूकर रामराजे, श्रीकिरण गीते, श्री संजय गीते शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.