आदर्श तिगावचे सुपुत्र संकेत सुमन तुकाराम सानप यांच्या प्रयत्नाना यश
मुंबई : सामाजिक बांधिलकी व लोकसेवा हाच आपला धर्म मानून काम करणार्या मुंबई मंत्रालयातील आदर्श तिगावचे सुपुत्र संकेत तुकाराम सानप यांनी पुन्हा एकदा जनसेवेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अनिल पुजांहरी कानवडे याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
कानवडे हे गेल्या काही काळापासून गंभीर आजाराशी झुंज देत असून, उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या कुटुंबासाठी एवढा खर्च परवडणारा नव्हता. याची दखल घेत मंत्रालय प्रतिनिधी संकेत सानप यांनी वैद्यकीय कागदपत्रांसह शासन दरबारी पाठपुरावा करून मदतीची फाईल मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पाठवली. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १ लाख रुपयांची मदत मंजूर करून रुग्णाच्या कुटुंबाच्या हाती पोहचवण्यात आली.
या मदतीमुळे अनिल कानवडे यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णालयातील वाढते खर्च, औषधोपचार व इतर वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत उपयोगी ठरणार आहे. या निर्णयाबद्दल गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेकडून संकेत सानप यांचे अभिनंदन होत आहे.
संकेत तुकाराम सानप यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, गरीब, शेतकरी, मजूर, दिव्यांग आणि आजारपणाशी झगडणार्या प्रत्येक गरजू कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मोठा आधार आहे. शासनाच्या प्रत्येक योजना व मदतीचा लाभ खर्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. अनिल कानवडे यांना मदत मिळाल्याने माझ्या सेवाकार्यातील एक ध्येय साध्य झाल्यासारखे वाटते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांनीही या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, संकेत सानप यांच्यासारखे तरुण प्रतिनिधी जर अशा पद्धतीने जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करत राहिले, तर खर्या अर्थाने शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल.
अनिल कानवडे यांच्या कुटुंबीयांनी या मदतीबद्दल मुख्यमंत्री, निधी प्रमुख तसेच संकेत तुकाराम सानप यांचे आभार मानले असून गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सामाजिक कार्य आणि जनसेवा हाच मार्ग निवडलेल्या संकेत सानप यांच्या या कार्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळत आहे.
शासनाची मदत जनतेच्या हाती हा उद्देश साध्य करताना आदर्श तिगावचे सुपुत्र संकेत तुकाराम सानप यांनी दिलेला हा दिलासा समाजातील वंचितांसाठी आशेचा किरण ठरला आहे.