छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून पोलीस अंमलदाराच्या पत्नीने तिसर्या मजल्यावरून स्वतःला झोकून देत आत्महत्या केलीय. ही खळबळजण घटना पोलीस आयुक्तालयातील वसाहतीमध्ये घडली. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सबा समीर शेख (वय २१, राहणार आय ब्लॉक पोलीस आयुक्तालय इमारत) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सबा यांचा अडीच वर्षांपूर्वी अंमलदार समीर शेख याच्याशी विवाह झाला होता. समीर हा शहर पोलीस दलात कार्यरत असून सध्या जीन्सी पोलीस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे. लग्नानंतर समीरने सबा यांना चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवसानंतर छळ करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून सबा माहेरी गेली होती. मात्र दोन्ही कुटुंबामध्ये मध्यस्थी झाल्यानंतर सासरी नांदायला पाठवले. त्यानंतर समीर हा तिच्यावर वेगवेगळी बंधन घालत होता. या त्रासाला सबा कंटाळली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सबाने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केलीय. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र, दसर्याच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.