नाशिक : १५ वी एशियन टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धा २०२५ (बीच कॅटेगरी) ही स्पर्धा २४ ते २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मलेशिया येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी १५ ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी मर्सी कॉलेज, पलक्कड, केरळ येथे घेण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू प्रणव किशोर दिघोळे याने निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट खेळ सादर करून नाशिक जिल्ह्यातील या खेळाडूंनी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. प्रणव याची अंडर २३ वयोगटात निवड झाली आहे. पुन्हा , प्रणव चे हार्दिक अभिनंदन व पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !