spot_img
17.1 C
New York
Saturday, October 11, 2025

Buy now

spot_img

पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

तात्काळ पंचनामे करा प्रहार जनशक्तीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यात आलेल्या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे . त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले .
सिन्नर तालुक्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेले आहे पिके पिवळी पडलेली आहे सडलेले आहे शेतकर्‍यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करण्यात यावे आज तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे त्यांना एकरी १ लाख रुपये भरपाई मिळावी. ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी शेतकर्‍यांना दिवाळीच्या आत न्याय मिळावा न्याय नाही मिळाल्यास रस्ता रोको व उपोषण करण्यात येईल अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास भाऊ दातीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे उपाध्यक्ष पांडुरंग आगळे प्रहार ओबीसी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड शहराध्यक्ष संगीता आगळे तालुकाध्यक्ष पुष्पाताई भोसले गणेश थोरात गोपाळ गायकर प्रकाश थोरात गणेश मस्के सुनिल जगताप विलास खैरनार सुनील वाघ गोविंद सहाणे भास्कर दराडे रोशन उगले दत्ता लोंढे योगेश कहाडळ पंकज पेटारेअनिल गवांदे उपस्थित होते यांनी तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्या