spot_img
20.7 C
New York
Thursday, September 11, 2025

Buy now

spot_img

वडीलांचा गळफास,तीन वर्षीय चिमुकलीही लटकलेली

बीड बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात या तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता तीन वर्षीय चिमुरडीचा देखील गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती. तिचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमूरडीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नसून ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, तर दोघांचा मृतदेह अशा अवस्थेत आढळून आल्याने हे कोडं सोडवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
गेल्या काही दिवसात बीडमधून अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना आज सकाळी देखील पाहायला मिळाली. तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह गळफास दिलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला दिसून आला. दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, आणि आज ही चिमुकली देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. आता पोलिसांसमोर हे कोड सोडवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यांनी का नेमकी आत्महत्या केली आणि चिमुरडीला का गळफास दिला? हे पोलीस तपासामध्ये लवकरच समजेल. मात्र ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोघे घरातून बाहेर पडलेले होते. घरचे यांचा शोध घेत होते, दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज चिमुरडी अशा अवस्थेत आढळून आल्याने बीड हादरलं आहे.
आज सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुहेरी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या