spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

परळीत चारचाकी गेली वाहून,तिघे वाचले एक बेपत्ता

बीड : परळी तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते.या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी सह गाडीतील चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.१७) मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास घडली.
यासंदर्भात तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावर सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. रविवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास दिग्रस (तालुका परळी) येथील अमर पौळ (वय २५), राहुल पौळ (वय ३०), पुणे येथील राहुल नवले (वय २३) व विशाल बल्लाळ (वय २३) हे परळी येथील लग्न समारंभातून कोडगाव हुडा मार्गे डिग्रस कडे बलेनो कार ने जात होते.
रात्री अंधारात पुलावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने व अंधारामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने कारसह चारही व्यक्ती पाण्यात वाहून गेले, काही जण पुरात झाडात अडकले होते. या घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजाभाऊ पौळ तसेच दिग्रस व कोडगाव हुंडा , पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेत रात्री १ ते ४ वाजेपर्यंत तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून नदीचे पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पौळ या युवकास बाहेर काढण्यात यश आले.
मात्र पाण्याचा जोर, नदीचा प्रवाह, अंधार यामुळे इतर तीन जणांना काढणे शक्य झाले नाही. ही शोध मोहीम पहाटे ६ पासून पुन्हा प्रशासन व गावकरी तसेच पोहणारे भोई यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू करून त्यातील राहुल पौळ व राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु विशाल बल्लाळ अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे काम पोहणारे भोई यांच्यामार्फत चालू आहे.
नगरपालिकेची टीम घटनास्थळी शोध घेण्यासाठी पोहचली असून एन डी आर एफ ची टीम पुण्याहून रवाना झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत जिल्हधिकारी बीड व पोलीस अधिक्षक बीड तसेच आमदार धनंजय मुंडे हे लक्ष ठेवून असुन आवश्यक मार्गदर्शन व मदत बचावकार्यास तहसीलदार व्यंकटेश मुंडे घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
या घटनेमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पौळ पिंपरी येथील रहिवासी राजाभाऊ पौळ यांना ही घटना समजताच मध्यरात्री आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. राजाभाऊ पौळ याच परिसरातील रहिवासी असल्याने या माहितीचे प्रशासनास सहकार्य लाभले. पाण्याचा प्रवाह कुठे,किती असू शकतो, कुठे कमी आहे, युवक नेटके कुठे असू शकतात ही माहिती असल्याने याचा फायदा प्रशासनाला झाला तसेच रात्रभर प्रशासनास आवश्यक ते सहकार्य केले. याबदल परिसरातील नागरीकांनी राजाभाऊ यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या