spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

तुळजापूरमध्ये कुंडलिनी जागृती,आत्मसाक्षात्कार चैतन्य सोहळा

धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर येथे परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार दिव्य चैतन्यमय सोहळा दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व सहजयोगी ताई दादांनी या चैतन्यमयी सोहळा आणि प्रचार प्रसार कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र राज्य, सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
परमपूज्य श्री माताजींनी सहजयोगची निर्मिती करून एक आगळा वेगळे रसायन सर्व जगासाठी तयार केले . त्यानुसार आजपर्यंत अनेकांनी सहजयोगाच्या माध्यमातून संकटावर मात केलेली आहे . त्यामुळे परमपूज्य श्री माताजींनी सहजयोग हा घरा घरात पोहचला पाहीजे यासाठी प्रयत्न केले. आणि त्यांचेच कार्य आपण सर्व सहजयोगींना करायचे आहे . प्रत्येक शहरात आणि प्रत्येक घरात सहजयोग कसा जाईल याचे प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी १४ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार चैतन्यमयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत.
तुळजापूर येथे तुळजापूर हे शहर आई तुळजाभवानी जगदंबा यांचे पवित्र स्थान साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ याच पवित्र भूमीमध्ये नवीन साधकांसाठी कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्काराचा दिव्य आणि भव्य असा चैतन्यमय सोहळा १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होत आहे.
दि.१२ सप्टेंबर २०२५ पासून प्रचार प्रसार कार्याला सुरूवात होणार असून शनिवार दि.१३ रोजी संध्याकाळी ७ ते ९.३० या वेळेत भजन संध्या होईल. यासाठी ज्येष्ठ गायक मुखीया रामजी व त्यांची सर्व टीम येणार आहे. बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या साधकांसाठी निवास व्यवस्था लोहिया मंगल कार्यालय नवीन एसटी बस स्टँड च्या पाठीमागे तुळजापूर येथे करण्यात आली आहे . तर रविवार दिनांक १४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री माताजींची भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार चैतन्यमय सोहळा पार पडेल .
तुळजापूर येथे येण्यासाठी धाराशिव येथील रेल्वे स्टेशन २६ कि.मी. आहे . तर सोलापूर पासून ४४ कि.मी.चे अंतर आहे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.

ताज्या बातम्या