spot_img
21.1 C
New York
Wednesday, September 17, 2025

Buy now

spot_img

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 नाशिक : शहरात श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधव व इतर समाज बांधव यांनी स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळेस संस्थेचे सरचिटणीस श्री रंगनाथ दरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र लढायचे एक खंबीर नेतृत्व असलेले आणि तळागाळातून आलेल्या लोकप्रतिनिधीतून एक होते अवघ्या फक्त दीड दिवसाच्या शाळेच्या शिक्षणावर आज ते साहित्यिक बनले त्यांच्या कित्येक कादंबरी आहे लेख आहे पोवाडे आहे आणि त्यांचा समाजप्रबोधनाचा उच्च शिखरावर पोहोचणारा एक बुलंद असा पहाडी असा आवाज या महाराष्ट्रात आजही गुंजत असतो. महिलांच्या सबलीकरण आणि महिलांसाठी त्यांची तळमळ आपल्याला माझी मैना गावाकडं राहिली ह्या त्यांच्या लोकगीतेतून आपणास अनुभवास मिळते महिलांच्या चालीरीती रूढी परंपरा आणि सामाजिक त्रासातून मुक्त करण्यासाठी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फार मोलाचा कार्य केलेला आहे आज या निमित्ताने त्यांना आपण सर्वांच्या वतीने त्रिवार अभिवादन करून असे मत व्यक्त करून परिसरात फळ व मिठाईवाटप करण्यात आली.उपस्थित श्री बाळासाहेब घुगे श्री रंगनाथ दरगुडे नाशिक जिल्हा सरचिटणीस दिव्यांग विकास आघाडी श्री दशरथ गांगुर्डे  सरचिटणीस श्री पगार श्री गवळी श्री परमिशन श्री गायकवाड श्री रसाळ श्री मोरे श्री कांबळे श्री घोरपडे श्री वाळुंज श्री वाजे त्याचप्रमाणे दिव्यांग विकास आघाडीचे  पदाधिकारी व  ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव आणि इतर समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न केला.

ताज्या बातम्या