spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यातील १७ सिंचन प्रकल्प रद्द

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ( राज्यातील ९०३ विकास प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केले आहेत. मागील ३ वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका बीड जिल्ह्याला बसला आहे.
बीडमध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये गाव तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे यांचा यात समावेश होता. जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्प रद्द करण्यासाठी दोन बैठका झाल्या. या सिंचन प्रकल्पासाठी ५ कोटी ३३ लाखांचा निधी देण्यात आला होता. दरम्यान आता लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतात? याकडेच लक्ष असणार आहे.
बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या १७ सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द झाली आहे. दुष्काळी बीड जिल्ह्याला पाणीदार बनवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून १७ सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही तीन वर्षात प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली. दुष्काळी झळा सोसणार्‍या बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ताज्या बातम्या