spot_img
23.7 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img

केजमध्ये अनैतिक संबंधातून संपवलं

मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केली काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण
केज  : पुन्हा एकदा केज तालुक्यात गंभीर घटनेचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या संशया वरून एका युवकाला त्याची मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.
केज तालुक्यातील केज येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्‍वर दत्तात्रय धपाटे वय 27 वर्ष रा. भाटुंबा ता. केज व त्याचा मित्र सचिन करपे याला दि. 26 मे रोजी दुपारी 4:30 वा. च्या सुमारास सावळेश्‍वर ता. केज येथील रोहन मरके, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून त्याला रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्याला शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली आणि त्या नंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तसेच याची माहिती मारहाण करणार्‍यांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्‍वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईल वरून त्याचा भाऊ सिद्धेश्‍वर धपाटे याला दिली. त्या नंतर सिद्धेश्‍वर धपाटे आणि गावातील लोकांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्‍वर दत्तात्रय धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केले. त्या नंतर काही वेळाने दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्‍वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी सिद्धेश्‍वर धपाटे याच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. 140/2025 भा. न्या. सं. 103(1), 140(2), 115(3), 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या