यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणी परमपूज्य आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने १ जून २०२५ रोजी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व साधकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन परमपूज्य श्री माताजींनी आपल्याला दिलेले कार्य आपण परमचैतन्याच्या माध्यमातून पार पाडूया असे आवाहन सहजयोग प्रचार-प्रसार टिम,महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हे गाव माहूरगड शक्तीपीठ या मार्गावर असून अदिलाबाद रेल्वे स्टेशनपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे . या पांढरकवडा भूमित श्री माताजींच्या कृपेने प्रचार प्रसार करण्याचा योग आला आहे . ३० मे पासून या ठिकाणी प्रचार प्रसाराला सुरूवात होणार आहे . शहरात विविध ठिकाणी सहजयोगा संदर्भात माहिती देणे, पोस्टर वाटणे आदी कार्य करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार दि.३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सहजयोगातील विख्यात पंडित श्री संदीप जी दलाल यांचा संगीत प्रोग्राम होणार आहे . तर रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी केईएस शाळेचे मैदान आखाडा वार्ड या ठिकाणी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार प्रोग्राम होणार आहे. बाहेर गावावरून येणार्या साधकांसाठी श्रीराम मंदिर तहसील कार्यालयाच्या बाजूला व्यवस्था करण्यात आलेली आहे . हे अंतर बसस्टॅण्डपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे . तरी सर्व साधकांनी प्रचार प्रसारात सहभागी होऊन परमचैतन्याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार-प्रसार टिम,महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
८३२९२५३७६९ – ९८२३३९८९०२
९०२८०९५९९७ – ८६०५६५५३९९
८८८८८२१५८५ – ८८०५७२९२७९
९१५८१०४८०२
वरील क्रमांकावर संपर्क करू शकता.