spot_img
17 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि त्यांच्या गँगविरोधात सीआयडीने आणखी एक ठोस पाऊल उचलले असून, महत्त्वाचे पुरावे बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सादर केले आहेत.
विश्‍वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसरी सुनावणी उद्या बीड न्यायालयात पार पडणार आहे. त्याआधी सीआयडीने काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, डिजिटल व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि जप्त मुद्देमाल न्यायालयाकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे तपासादरम्यान नव्याने हाती आलेल्या माहितीच्या आधारे हे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
सीआयडीने यापूर्वी १४०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. मात्र, तपास अधिक खोलात गेल्यानंतर नव्या बाबी समोर आल्याने आरोपींच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि त्यांच्या गँगविरोधात सबळ पुरावे सादर केल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या