spot_img
-11.7 C
New York
Friday, January 30, 2026

Buy now

spot_img

कुलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून मृत्यू

गेवराई :चालू कुलर मध्ये पाणी टाकत असताना, अचानक विद्युत प्रवाहाचा शॉक बसल्याने तलवडा ता. गेवराई येथील जनरल स्टोअर्स चे मालक प्रशांत चंद्रकांत मदुरे यांचा मृत्यू झाला आहे. घटना शनिवार ता. ५ रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे. घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
तलवडा ता.गेवराई येथील जनरल स्टोअर्स चे मालक प्रशांत चंद्रकांत मदुरे वय वर्ष ४२ हे स्वतःच्या घरातील चालू कुलर मध्ये पाणी टाकत होते. पाणी टाकत असताना, त्यांना अचानक विद्युत प्रवाहाचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. रविवार ता. ६ रोजी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रशांत मदुरे मनमिळाऊ स्वभावाचे होते. गावातच त्यांचे जनरल स्टोअर्स चे दुकान होते. अचानक घडलेल्या घटनेने नातेवाईक, गावकरी, मित्र, आप्तेष्टांना धक्का बसला आहे. रविवार ता. ६ रोजी सायंकाळी तलवडा येथील स्मशानभूमीत प्रशांत मदुरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, तीन बहिणी, असा परिवार आहे.

ताज्या बातम्या