spot_img
19 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img

शिवडे घाटातील विहिरीमध्ये पडला बिबट्या

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
जिल्ह्यातील शिवडे येथील वन विभागाच्या हद्दीलगत खाजगी क्षेत्रात असलेल्या श्री कैलास नारायण वाघ गट नंबर ५४६ यांच्या विहिरीत काल रात्रीच्या सुमारास अंदाजे तीन वर्षे वयाच्या नर जातीचा बिबट्या पडल्याचे श्री कैलास यांच्या पत्नी सौ चंद्रकला निदर्शनास आले सध्या लसुन काढण्याचे काम सुरू असून लसुण काढण्यासाठी ते विहिरीलगत गेले असता त्यांच्या निदर्शनास हा बिबट्या आला. हरित सेनेचे सदस्य (वन मित्र) यांनी ही घटना वनविभागास . वनपाल कोनांबे येथील श्री संतोष हिंदे यांना भ्रमणध्वनी वरून कळवले. तात्काळ संतोष हिंदे आणि बाबुराव सदगीर यांनी रेस्क्यू करण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहे .
सध्या शिवडेतील वन विभागाच्या हद्दीतील नैसर्गिक जलस्रोत आटले असून खाजगी विहिरींनाही पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे पाण्याच्या शोधात बहुदा बिबट्या आला असावा असा अंदाज त्यामुळे कृत्रिम पाण्याचे स्रोत वन्यप्राण्यांसाठी तयार करून देणे आवश्यक असून त्यासाठी उपाययोजना करणे ही गरजेचे आहे तसेच वन विभागाच्या हद्दीतील समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असून ते कामही रस्ते विकास महामंडळाने संबंधित ठेकेदार कंपनीकडून करून घेणे गरजेचे आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीच शिवडे घाटात समृद्धी महामार्गावर बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत झाला होता.

ताज्या बातम्या