spot_img
11.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

असा सादर झाला राज्याचा अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे.महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वाढ होत असल्याचे अजित पवार म्हणाले.राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल.
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे. याशिवाय शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार 2.0 च्या टप्प्यातील कामं मार्गी लागणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.
परिवहन विभागाला 3610 कोटींचा निधी प्रस्तावित.
परिवहन विभागाला 3610 कोटींचा निधी प्रस्तावित. मुंबईत 41 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारणार
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी तलंच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
नवी मुंबई विमानतळाचं 85 टक्के काम पूर्ण
नवी मुंबई विमानतळाचं 85 टक्के काम पूर्ण झालं आहे. नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग होणार.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64 हजार कोटींचे प्रकल्प
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64 हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित. ययाशिवाय पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर तळेगाव ते चाकण उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार
राज्यातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार. एमएमआर क्षेत्र ग्रोत सेंटर म्हणून विकसित केलं जाणार. याशिवाय शक्तिपीठ महामार्गांच्या भूसंपादनाचं काम प्रगतीपथावर असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं.
वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ प्रस्तावित
वाढवण बंदर जेएनपीटीच्या तिप्पट असेल. वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ प्रस्तावित असल्याचं अजित पवार म्हणाले.
सिंधुदुर्गात देवबाग येथे सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. रस्ते विकास प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाल्याचं अजित पवार म्हणाले. याशिवाय अमृतकाल रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित असल्याचंही त्यांनी म्हटलं,
2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य
76 हजार कोटींचं वाढवण बंदर, राज्याचा वाटा 26 टक्के. पर्यटनाला बंदर करातून सूट देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना होणार
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. बंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरसाठी भूसंपादनाचं काम सुरू. यामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगांची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्याला तांत्रिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना होणार.
राज्याचं नवं औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीत 40 लाख कोटींची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल. यासोबत आकाश व संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष-लघू-मध्यम उपक्रम धोरण, चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
कृषी विभागासाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद
कृषी विभागासाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला 4 हजार 247 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.
मुंबई, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केली जाईल. याशिवाय एक तालुका, एक बाजार समिती योजना राज्यभर राबवली जाणार आहे. मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक जलद होण्यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आलेत. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजित. ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नार-पार नदीजोड प्रकल्पाला गती देण्यात येईल. नदीजोड प्रकल्पाचा नागपूरसह सहा जिल्ह्यांना लाभ मिळेल. नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पाचा लाभ विदर्भातील सहा जिल्ह्यांना होणार.राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येणार असून प्रत्येक व्यक्तीला 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणं आणि अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे.


कर महसूलाचे उद्दिष्ट्य 3 लाख 67 हजार कोटी.
कर महसूलाचे उद्दिष्ट्य 3 लाख 67 हजार कोटी. वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यात येण्यापूर्वी राज्य कर विभगातर्फे राबण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेल्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अभय योजनेची सुरुवात केली जाणार आहे. याचं नाव महाराष्ट्र कर व्याज किंवा विलंब शुक्ल असं असेल. याचा कालवधी लागू झाल्यापासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल.
3 ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात सन्मान दिन साजरा केला जाणार
मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित. 3 ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात सन्मान दिन साजरा केला जाणार
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक
संगमेश्‍वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याशिवाय पानिपत येथे मराठा शौर्याचं यथायोग्य स्मारक उभारलं जाईल. तर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.
पुण्यात दुसर्‍या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग उभारण्यात येणार
पुण्यात दुसर्‍या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार. दुसर्‍या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी 9897 कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा ्प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.
ठाण्यात 200 खाटांचं, रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय
ठाण्यात 200 खाटांचं, रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येणार. स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने आनंदवनला देण्यात येणार्‍या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात वाढ करण्यात येणार.
लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च
लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल असेल. पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभे करणार.
लेक लाडकी योजनेंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ
लेक लाडकी योजनेंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आलाय. 2025-26 साठी या योजनेसाठी 50.55 लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित. मुलींच्या व्यवसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 100 टक्के प्रतीपूर्तीसाठी करण्यात येत आहे.
अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत 42 टक्क्यांची वाढ
अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत 42 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत 40 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. धनगर, गोवारी समाजासाठी 22 कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.
आवास योजनेतील लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणार
राज्यात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आवास योजनेतील लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणारे. राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून 1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॅट पेक्षा अधिक क्षमतेचे सौर ऊर्जासंच स्थापित केलेत. 1 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदानाचा लाभ देण्यात आलाय.

ताज्या बातम्या