बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या होत असताना मारेकरी ज्या पद्धतीने हसत होते, त्यांच्या शरीराची लचके तोडत होते, इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीरावर लघुशंका सुद्धा करण्यात आली तो घृणास्पद प्रकार पाहून राज्यांमध्ये एकच उद्रेक झाला होता. या उद्रेकानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेल्या दोन महिन्यापासून जो चर्चेत सुद्धा तो सुद्धा झाला. या सर्व घटनानंतर आता कॉंग्रेसने मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बीडमध्ये पोहोचले आहेत. बीडमध्ये त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
दरम्यान, मस्साजोग ते बीड ही ५१ किलोमीटरची पदयात्रेत राज्यभरातील कॉंग्रेस पदाधिकारी सामील झाले आहेत. यात्रेच्या माध्यमातून सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सद्भावना यात्रेची सुरुवात बीड जिल्ह्यातून होणार आहे त्यानंतर ही यात्रा राज्यभरामध्ये निघणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
संतोष देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये, देशमुखांचा बळी का एका प्रवृत्तीमुळे गेला आहे आणि याबाबत समाजाने चिंतन करण्याची गरज असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. ही लढाई एकट्या कुटुंबाची नसून सोबत कॉंग्रेस सुद्धा असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दरम्यान, त्यांनी सांगितले की देशमुख कुटुंबियांनी सुद्धा इतका मोठा आघात झाल्यानंतरही सद्भावना जपल्याचे सांगितले. धनंजय देशमुख असतील किंवा त्यांची मुलगी असेल त्यांनी कुठेही त्यांची तोल ढळू दिला नसल्याचे सांगितले. त्यांनी आपले सद्भावना जोपासली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आजवर कोणत्याही जाती, धर्माचे नाव घेतलेलं नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.