लातूर : परमपूज्य श्री माताजी श्री निर्मलादेवींच्या आशीर्वादाने मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा क्षेत्रीय महाशिवरात्री पुजा लातूर येथे दिनांक १ आणि २ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे . तरी या पुजेचा लाभ साधकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर येथील मधुरिमा मंगल कार्यालय, कोकाटे नगर, सुतमील रोड येथे १ मार्च आणि २ मार्च रोजी परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत मराठवाडा आणि सोलापूर क्षेत्रीय महाशिवरात्री पुजा आयोजित केली आहे. दिनांक १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम , तर संध्याकाळी ६.३० वाजता सहज संगीत संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री पुजा ही दिनांक २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सर्वांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी या पुजेत सहभागी व्हावे असे आहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अशोक व्यवहारे-९४२१५३२५००, व्यंकट ढगे-९८९०३४८०२७, सौ.मनिषाताई झिल्ले-८७८८६५८३२३, आदिती साबणे-७७४१८६०४००, यांच्याशी संपर्क करावा. नोदणीसाठी अरूण चव्हाण-९४०४६८२१३८, नितीन कल्याणी-७८२१०१०१६८, अरविंद कांबळे-९८५०४८५०७५, गणेश भिसे-८२३८४८०६३ यांच्याशी संवाद साधावा . तर वाहतुक माहितीसाठी माधव बिराजदार-८८०५७३५०७४, राजकुमार पिनाटे-९४२२०७११४५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.