spot_img
10.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ

धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला?
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. करुणा मुंडे  यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीदरम्यान वांद्रे कौंटुबिक न्यायालयानेधनंजय मुंडे यांना सूचना दिल्या. न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीनंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटलं. गेल्या अनेक महिन्यांपासून घराचा हफ्ता भरलेला नाही, त्यामुळे १५ लाख रुपये मिळावे यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. मात्र आता करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले आहे. त्यामुळे आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा वडिलांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. वडील आईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्या सोबत तसे वागले नाहीत असं सिशिव मुंडेने म्हटलं आहे. सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला आहे. त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
मी सीशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलणे महत्वाचे वाटते कारण मिडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहेत. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचवणारे नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिले आणि तेथून जाण्यास सांगितले. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही, असं सीशिवने स्पष्ट केलं आहे.
२०२० पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहेत आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझी आई काही ना काही बहाने बनवत राहते. माझ्या आईने घरावरचं कर्ज सुद्धा फेडलेले नाही. आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे, असंही सीशिवने म्हटलं आहे.
माझ्या लढ्याला यश आलं आहे. कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिला आहे. बायको नसून, पोटगीसाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. माझी दर महिना १५ लाखांची मागणी आहे. माझा एक लाख ७० हजारांचा घराचा हफ्ता आहे. ७ ते ८ महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. ३० हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घरात बेरोजगार बसला आहे. दोन लाखात काय होणार?, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या