केज : केज तालुक्यातील तूकुचीवाडी येथे शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, मंगळवारी (दि.१७) दुपारी केज तालुक्यातील तूकुचीवाडी येथे २३ वर्षीय महिला ही घरपासून जवळ असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. शेतात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन कल्याण आश्रुबा चौरे या नराधमाने तिच्या पाठीमागून जात शेतात कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान पीडीतेच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपी कल्याण आश्रुबा चौरे याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० डिसेंबर पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.