spot_img
6.7 C
New York
Wednesday, December 18, 2024

Buy now

spot_img

अहवाल आला, जबर मारहाणीने देशमुखांचा मृत्यू

डोळे काढणे, डोळे जाळण्याबाबत अहवालात दुजोरा नाही
बीड :   मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला अटक करण्यात आली असून आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात चार आरोर्पीना गजाआड केले आहे. दुसरीकडे संतोष यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी पोलिसांना सादर केला आहे. या अहवालात संतोष यांचा मृत्यू प्रचंड मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डोळे काढणे अथवा लेझरने डोळे जाळणे याबाबत अहवालात कुठलीही स्पष्टता दिसून येत नसून संतोष यांना एवढी मारहाण झाली आहे की, त्यांच्या शरीरावर एकही जागा अशी मारहाणीविना नसल्याचे अहवालातन स्पष्ट दिसून येते
शवविच्छेदन अहवालात काय ?
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात सांगितले गेले आहे. संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळणे, डोळे काढणे याबाबतचा आरोप होत आहे. याबाबत आम्ही थेट जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी डोळे जाळणे अथवा डोळे काढण्याबाबत च्या घटनाक्रमाला दजोरा दिला नाही.
मस्साजांग येथील सरपच सतोष देशमुख यांची निर्धाणपणे हत्या करण्यात आली. या हत्येने अवघा महाराष्ट्र हळहळच नव्हेतर संतापलाही. या हत्येचे तीव्र पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाबरोबर थेट दिल्लीच्या संसदेतही उमटले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करत त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी सर्वस्तरातून होत गेला. आतापर्यंत सात आरोपीपंकी केवळ तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी विष्णू चाटे हा फरार होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात अखंर बांड पोलिसांना रात्री यश आले, त्याला अटक करण्यात आली असून आज विष्णू वाटेला न्यायालयासमोर हजर करण्यात वणार असल्याच सागण्यात यत. दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या मृत्युबाबतचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पोलिसांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात संतोष देशमुख यांचा मृत्यू हा प्रचंड मारहाणीमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. डोळे काढणे अथवा डोळ जाळण्याबाबत या अहवालात काहीही म्हटलेले नाही. परंतु संतोष यांच्या शरीरावर अशी कुठलीही जागा शिल्लक नव्हती की तिथं मारहाण झालेली नव्हती.

ताज्या बातम्या