spot_img
7.1 C
New York
Wednesday, December 18, 2024

Buy now

spot_img

लाडक्या बहिणीसाठी १४०० कोटीची तरतूद

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३५,७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या
नागपूर : नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आज ३३,७८८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये १४०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झाले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून १४०० कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. याशिवाय, मुंबई मेट्रो ३ साठी ६५५ कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून ३६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच ७ हजार ४९०.२४ कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी ३ हजार १९५ कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत.
हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.पुरवणी मागण्यांपैकी ३ हजार ५० कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतर्ंगत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी १२०४ कोटी तर दुध उत्पादक शेतकर्‍यांना ७५८ कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.

ताज्या बातम्या