बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात निषेध नोंदवण्यासाठी आज (शुक्रवार) सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणादेखील अलर्ट मोडवर असून, एस आर पी एफ च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
याबरोबरच स्थानिक पोलिसांचा देखील ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली. तसेच बंदच्या पार्श्वभूमीवर काही जणांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. नागरिकांनी बंद काळात शांतता राखावी असे आवाहन सचिन पांडकर यांनी केले आहे.