किल्लेधारूर : तालूक्यातील गोपाळपूर येथील श्रीमंत विठोबा मुंडे हे शेतात राखणी साठी झोपलेले असताना इंडीका गाडीत येऊन तिन ते चार चोरट्यानी त्याऩा पैशाची मागणी करत आरडाओरड केली तर दगडाने मारहाण केली व जखमी केले त्या़चे वर धारूर ग्रामीण रुग्नालयात उपचार करण्यात आले त्यांचे तक्रारी वरून अज्ञात तिन ते चार चोरट्या विरूध्द धारूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.
किल्लेधारूर आसरडोह रस्त्यावर गोपाळपुर येथील भायजळी रस्त्यावर शेतात राञीचे राखणी साठी श्रीमंत विठोबा मुंडे हे झोपलेले असताना राञी उशीरा बार नंतर इंडीका गाडी क्र ४७११ या गाडीत मागे जयमल्हार लिहलेले गाडीत अज्ञात चोरटे येऊन त्याऩा उठवून पैशाची मागणी करू लागले व असेल ते दे म्हणु लागले श्रीमंत मुंडे याऩी तात्काळ ओरडण्यास सुरूवात केली तर या चोरट्यानी त्यांनादगडाने मारहाण केली व मुका मार देऊन जखमी केले शेजारील एक शेतकरी त्या़चे ओरडण्याने पळत येताच हे चोरटे या इंडीका गाडीत पसार झाले. श्रीम़त मु़डे या़चे घरच्याना गावातून बोलवून त्याऩा धारूर ग्रामीण रुग्णालय उपचारा साठी नेण्यात आले. धारूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूध्द मारहणी चा गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे या घटने मुळे शेतक-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.