spot_img
5.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

स्विफ्ट कार-ट्रकचा अपघात चार ठार ;दोन जखमी

अंबाजोगाई  : मित्राची पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे जेवणाच्या पार्टीसाठी गेलेले मित्र परत येत असताना स्विफ्ट कार व ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन यात तिघेजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोघेजण जखमी आहेत.या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत कार्यपर गावावर शोककळा पसरली आहे.
मित्राची पुणे येथे पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेही भोजनाचे आयोजन केले होते. रेनापुर तालुक्यातील कार्यपूर या गावचे मित्र सोमवार रात्री जेवणासाठी मांजरसुंबा जवळ गेले होते. तेथे जेवण करून पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच 14, एल एल 6749 मांजरसुंबा येथून निघून पुढे आंबेजोगाई कारखाना मार्गे रेणापूरकडे जात असताना वाघाळापाटी येथे समोरून येणार्‍या ट्रकला समोरासमोर शिफ्ट कारची धडक झाल्यामुळे कारचा चुराडा होत शिफ्ट कार मधील तिघेजण जागेवरच ठार झाले .यात मयत बालाजी शंकर माने वय 27,फारुख बाबुमिंया शेख वय 30,दिपक दिलीप सावरे वय 28 , ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू)यातील जख्मी मुबारक शेख,अजिम पाशुभाई शेख 30 वय (पोलीस निवड) स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी धाव घेत जखमेवर तात्काळ रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार होत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणले आहेत.

ताज्या बातम्या