ज्ञानेश्वर काकड | नाशिक
सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावनी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकर्यांच्या बांधावर जावुन शेतकर्यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय ,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणार्यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकार्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणार्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, शेरस्त्याअभावी नापिक राहणार्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या,प्रशासकीय कार्यालयामध्ये येणार्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा,मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळालेने १६/१२ /२०२४ रोजी जळगाव जिल्हाधिकार्यालयावर शेतकर्यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने देण्यात आला आहे.
शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी ,विभाजन शेतीमधील कमी होणार्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय सर्पदंश विज पडणे पुर येणे आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकर्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.१६/१२/२०२४ रोजी शेतकर्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल याची प्रशासणाने गांभिर्याने दखल घ्यावी यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन उपजिल्हाधिकारी वाघ साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांकडे दिले असुन निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे ,राळेगणसिद्धी, माननीय पोलिस अधिक्षक नाशिक कार्यालय, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव साहेब यांना दिल्या असुन निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले,प्रकाश होनराव,डॉ.धीरज होले,दीपक शिंदे, ज्ञानेश्वर घोटेकर,भाऊसो तासकर, दत्तात्रय घोटेकर, विलास दौंड, वाल्मीक गायकवाड,गोरख मालसाने आदींच्या सहया आहेत शेवटच्या शेतकर्याला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत थांबणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ग्रामसमृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या-शरद पवळे
महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकर्यांमध्ये शेत रस्त्यांच्या कारणामुळेआपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकर्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्यसमन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले.
ग्रामसमृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या-शरद पवळे
(महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)