कुंडलिनी शक्ति जागृती कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
गेवराई : परमेश्वर हा सुक्ष्म असून प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे. परमेश्वर हा अनंतयोगी आहे. परमेश्वराचे अस्तित्व हे अथांग आहे. तर योगा करुन आत्म्याने परमेश्वरा पर्यंत पोहचता येते तर जीव आणि शिव यांच्याशी एकरुप होवून परमेश्वरांशी एकरुप व्हायचं असेल तर सहजयोग करणं गरजेचं आहे. मानवी जीवात खुप शक्ती आहे फक्त तीची प्रचिती येणं महत्वाचं आहे. परमपूज्य माताजी निर्मलादेवी यांचा हा सहजयोग अनुभूतीचा कार्यक्रम आहे. तर आत्मा आणि परमात्मा यांचा योग येणं म्हणजे सहजयोग होय असे प्रतिपादन सहजयोगाचे मुख्य मार्गदर्शक उमेश तोगे यांनी व्यक्त केले.
गेवराई शहरात परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत रविवार दि.८ डिसेंबर रोजी सायं.७ वाजता कुंडलिनी शक्ति जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक सौ. गिताभाभी बाळराजे पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर , सौ. भाग्यश्री लक्ष्मण पवार, सौ. रत्नमाला मोटे, पत्रकार मधुकर तौर , विनोद नरसाळे, अमोल वैद्य, भागवत जाधव, विनोद पौळ, सुशील टकले, अमोल कापसे यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान यावेळी गेवराई शहरातून मिरवणूक मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहजयोगी ताई-दादांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिंगाबर नजन तर आभार प्रदर्शन अमर कदम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेवराई सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सहजयोगाच्या साधकांनी विशेष परिश्रम घेतले.
सहजयोगाचे फायदे :-
१५० पेक्षा जास्त देशात सहजयोगाचे साधक योगा करत आहेत. सहज योगामुळे आपले सगळे आजार बरे होवू शकतात, माणुस बॅलन्स मध्ये येवून शांत होतो तसेच निर्णय क्षमता वाढते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होवून बुध्दीमत्ता वाढते, मनाला शांती मिळते आणि आत्मसाक्षात्कार मिळतो, योगातून परमेश्वराची प्राप्ती होवू शकते, साधू संत हे मध्यनाडीवर राहतात, माऊली कुंडलीनी शक्ती जागृत होते, स्वादिष्टान्न चक्र क्लेअर पाहिजे त्यामुळे कोणत्याही कामात नेपुण्य लाभते तसेच मानवी शरीरातील शिवशक्ती जागृती होते.