spot_img
3.3 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img

भोगलवाडीत अंगणवाडीचा खाऊ काळ्या बाजारात

किल्ले धारूर : तालुक्यातील भोगलवाडीतील एका अंगणवाडीतील लहान बालकांचा खाऊ काळ्या बाजारात विक्री करताना गावातील तरूणांनी सतर्कतेने पकडला.याबाबत संबंधित अधिकारी काय कारवाई करतात. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
भोगलवाडी ता.धारूर येथील एका अंगणवाडीतील लहान बालकांसाठी आलेला खाऊ सदरील अंगणवाडी कार्यकर्तीने बालकांना खाऊ न घालता काळ्या बाजारात विक्री केला.सदर खाऊ ज्याने खरेदी तो एका रिक्शात घेऊन जात असताना गावातील तरूणांना संशय आल्याने त्यांनी त्या रिक्शा चालकास अडवत काय माल आहे.कुठून आणला.असे प्रश्न विचारले असता.त्याने सांगितले की,भोगलवाडीतील अंगणवाडी क्र.४ च्या आशाबाई वेदपाठक यांच्याकडून हा माला विकत घेतल्याचे सांगितले.यावेळी तरूणांनी व नागरिकांनी रिक्शातील माल तपासला असता त्यात अंगणवाडीतील लहान बालकांच्या खाऊसाठी असलेले मिक्स तुरदाळ ७१ पुडे, मुगदाळ ४७ पुडे,मीठ ५पुडे,सुकडी (शिरा)१७ पुडे, हळद ६० पुडे, मिर्ची ११५ पुडे असा माला आढळून आला.त्यावर सर्व ग्रामस्थांनी त्या अंगणवाडी कार्यकर्तीकडे विचारणा केली असता ती उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागली.त्यानंतर संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिकेस माहिती देऊन, या घटनेचा पंचनामा करून घेतला.त्यात हा माल याच अंगणवाडीतील असल्याचे समजते.केवळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अंगणवाडी बालकांचा खाऊ काळ्या बाजारातुन परत येऊन, तो लहान बालकांना मिळेल.याबाबत धारूर पोलीस ठाण्यात संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांच्या विरोधात अंगणवाडीतील बालकांचा खाऊ काळ्या बाजारात विक्री केला म्हणुन फिर्याद देण्याची तयारी ग्रामस्थांत चालुच होती.याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी किल्लेधारूर यांनी गंभीरतेने दखल संबंधित काळा बाजार करणार्‍यांवर कारवाई व दंडात्मक कारवाई करावी.अशी मागणी भोगलवाडी ग्रामस्थ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या